Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : बसची दुचाकीला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

Jalgaon News : दुचाकीने जळगावकडून उमाळा येथे जात होते. या दरम्यान रस्त्यावरील ललवाणी गोशाळेसमोर मागून येणाऱ्या बसने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली धडकेत दुचाकीस्वार मयाराम अछाले याचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरचा अपघात जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारात घडला आहे. याप्रकरणी बसवरील चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील मयाराम फुलसिंग अच्छाले (वय ३०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान मायाराम हा उमाळे येथील सिताराम जवानसिंग शिसोदिया (वय २९) या मित्रांसोबत दुचाकीने जळगावकडून उमाळा येथे जात होते. या दरम्यान रस्त्यावरील ललवाणी गोशाळेसमोर मागून येणाऱ्या बसने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मयाराम अछाले याचा जागीच मृत्यू झाला. 

सोबत असलेला सिताराम सिसोदिया हा गंभीर जखमी झाला. दरम्यान घटना घडल्यानंतर जखमी सिताराम सिसोदिया याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात बसवरील चालक विलास दौलत जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वनोजा येथे घराला आग, तीन शेळ्यांचा मृत्यू
वाशिमच्या वनोजा येथे सुनीता जाधव यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा शेळ्या भाजल्याने जखमी झाल्या आहेत. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. दुर्दैवी घटनेत जाधव कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले असून या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रशासनाने योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी सुनिता जाधव केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT