Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: दुचाकीला ट्रकची मागून धडक; एकुलत्‍या एक मुलाचा जागीच मृत्‍यू, अन्‍य एक गंभीर जखमी

दुचाकीला ट्रकची मागून धडक; एकुलत्‍या एक मुलचा जागीच मृत्‍यू, अन्‍य एक गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दुचाकीने बांभोरीकडे जात असलेल्‍या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येत असलेल्‍या ट्रकने धडक दिली. यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने समोरून आलेल्‍या ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्‍यू (Accident Death) झाला. तर सोबत असलेला मित्र गंभीर जखमी आहे. सदर घटना महामार्गावरील द्वारकानगर थांब्‍याजवळ घडली. (Tajya Batmya)

गहूखेडा (ता.रावेर) येथील प्रशांत भागवत तायडे (वय-३०) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील (वय २३) हा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र असून ते आज (ता. ६) सकाळी गहुखेडा येथून दुचाकीने (क्र. एमएच, १९ सीपी २३५५) बांभोरीकडे जाण्यासाठी निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास खोटेनगरच्‍या पुढे द्वारकानगर थांब्‍याजवळ भरधाव आयशर ट्रक (क्र, एमएच १९ सीवाय ८१६७) ने दुचाकीला मागून धडक (Accident) दिली.

धडक बसताच दोघे फेकले गेले

ट्रकची मागून धडक बसल्‍याने प्रशांत व जयेश हे दोघे रस्त्यावर पडले. याचवेळी समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर (क्र, एमएच १९, एएन २४३८) आल्‍याने प्रशांत तायडेच्‍या डोक्‍यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागीच ठार झाला. तर मागे बसलेला जयेश पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचत मृतदेहाचा पंचनामा केला.

कुटुंबियांचा आक्रोश

जखमी झालेला जयेश पाटील याला तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर प्रशांतचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. येथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. मयत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई साधना, वडील भागवत नागेश्वर तायडे आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने प्रशांतचा मृतदेह पाहून आई वडीलांनी आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Tumor: अचानक ताप येण्यासोबत ही ४ लक्षणं दिसली तर असू शकतो ब्रेन ट्यूमरचा धोका; कसे ओळखाल संकेत?

Crime News : घराच्या छपरावर चढला, आईवर बंदुकीने निशाणा धरला; पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची गोळी झाडून हत्या

Municipal Elections Voting Live updates : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Bank Jobs: खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Eggless Banana Cake : लहान मुलांनसाठी एग्लेस बनाना केक करायचा आहे? लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT