Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: हळदीच्‍या कार्यक्रमाला येताना अपघात; विवाहितेचा मृत्‍यू

हळदीच्‍या कार्यक्रमाला येताना अपघात; विवाहितेचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आतेभावाच्‍या लग्‍नानिमित्‍ताने जळगावी येत असलेल्‍या विवाहितेचा पाळधीजवळ महामार्गावर झालेल्‍या अपघातात मृत्‍यू झाला. झुरखेडा (ता.धरणगाव) येथील कविता प्रशांत चौधरी असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर दुचाकीस्वार विलास देवीदास चौधरी हे गंभीर जखमी आहेत. (Tajya Batmya)

झुरखेडा (ता.धरणगाव) येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात राहतात. आत्याच्या मुलाचे लग्‍न असल्‍याने हळदीसाठी त्‍या सोमवारी शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांच्‍यासोबत दुचाकीवरुन येत होत्‍या. परंतु, पाळधीच्या पुढे आल्‍यावर मागून भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.

दोन्‍ही पायावरून गेले चाक

डंपरने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता हे रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT