jalgaon Accident News 6 tourist from amalner dies in car accident in rajasthan Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon Accident: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेले, पण काळाने घातली झडप; जळगावातील शिक्षकाचं अख्खं कुटुंब संपलं

Amalner Teacher Accident: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षक कुटुंबियांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कुटुंबियातील प्रत्येकी ३ अशा ६ जणांचा मृत्यू झाला.

Satish Daud

Jalgaon Amalner Teacher Accident News

दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षक कुटुंबियांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कुटुंबियातील प्रत्येकी ३ अशा ६ जणांचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास राजस्थानमध्ये घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा सोनवणे (वय ५०), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (वय ५) गायत्री योगेश साळुंखे (वय ३०), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय १) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. कार कंटेनरवर धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

मृत शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय अमळनेर तालुक्यातील (Jalgaon News) रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे आणि योगेश धोंडू साळुंखे या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब कारने राजस्थान फिरायला गेले होते.

दोन्ही कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर त्यांच्या कारला भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला. डोरीमना गावाजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तकारने एका कंटेनरला धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारमधील धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे, मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे तर योगेश साळुंखे यांची पत्नी गायत्री योगेश साळुंखे, त्यांचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे, आणि मुलगी भाग्यलक्ष्मी साळुंखे जागीच मृत्यू झाला.

तर सुरेखा ह्या जखमी होत्या. त्यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. ऐन दिवाळीत शिक्षक कुटुंबीयावर काळाने घाला घातल्याने अमळनेर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे सर्व मृतदेह धोरिमान्ना हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT