Raosaheb danve
Raosaheb danve saam tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve Offer To Congress Mla: 'हे डबल इंजिनचं सरकार, ज्याला बसायचं त्याने बसावं, मात्र ड्रायव्हर मी आहे', दानवेंची काँग्रेस आमदाराला ऑफर

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Raosaheb Danve Offer to Congress Mla: ''हे डबल इंजिनचं सरकार आहे. ज्याला बसायचं त्यानं बसावं. मात्र या ट्रेनचा ड्रायव्हर मी आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्याच्या काँग्रेस आमदारांना थेट ऑफर दिली आहे.

आज जालना नगर परिषदेच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज उद्यानात १५० फुट उंच राष्ट्रीय ध्वज आणि मोती तलाव चौपाटीवर रेल्वे इंजिन (लोकोमोटीव्ह) बसविण्याचा भुमिपुजन सोहळा आज दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे म्हणाले की, आमचे डबल इंजिनचे सरकार आहे, ज्याला कुणाला आमच्या गाडीत बसायचे त्याने बसावे. पण ड्रायव्हर मीच राहणार, अशा शब्दांत त्यांनी काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांना थेट भाजपमध्ये येण्याची आॅफरच दिली. (Latest Marathi News)

यावर आपल्या हिंदी आणि शायराना अंदाजात ` मै चलती ट्रेन मे कभी बैठा नही`, खाली इंजिन होणेसे काम नही चलता, उसका हमारा डब्बा भी जरूरी है`, असे प्रत्युत्तर देत गोरंट्याल यांनी देखील रंगत आणली.

या दोन्ही नेत्यांच्या भाषणाची जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. (Jalna) दानवे आणि गोरंट्याल जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यात राजकीय मैत्री आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हे दोघे एकाच कार्यक्रमात दिसून आले आहेत. गोरंट्याल यांना भाजपमध्ये येण्याची आॅफर देण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी देखील जाहीर कार्यक्रमातून दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी देखील गोरंट्याल यांना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली होती. परंतु गोरंट्याल ही आॅफर काही स्वीकारत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : नवी मुंबईत भाजपमध्ये अचानक राजीनामासत्र; निवडणूक धामधुमीत असं काय घडलं?

DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

Pakistan Squad: पाकिस्तानकडून १८ सदस्यीय संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाचं कमबॅक

Hair Care Tips: कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

Ankita Lokhande: व्हायचं होतं हवाईसुंदरी, पण झाली अभिनेत्री

SCROLL FOR NEXT