Manoj jarange Patil Playing Cricket VIDEO Saamtv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: सभा, रॅलींमधून थेट क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री.. जरांगे पाटलांची धुवांधार बॅटिंग; VIDEO

Manoj jarange Patil Playing Cricket: नेहमी रॅली अन् सभा गाजवणारे मनोज जरांगे पाटील थेट क्रिकेटच्या मैदानात पोहोचलेत. अंतरवाली सराटी येथील सभेच्या मैदानावर त्यांनी क्रिकेट खेळण्याचा सराव केला.

Gangappa Pujari

लक्ष्मण सोळुंके, जालना|ता. २४ डिसेंबर २०२३

Manoj jarange Patil Video:

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. या मराठा आरक्षणाच्या लढ्यात अग्रस्थानी आहेत ते मनोज जरांगे पाटील. गेल्या तीन महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारत सरकारची कोंडी केली आहे. राज्यभर त्यांच्या सभा, रॅल्यांचा धडाका सुरू आहे.

जरांगे पाटलांच्या सभांची गर्दी, त्यांच्या भव्यदिव्य स्वागताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अशातच आता रॅल्या अन् सभांमधून मनोज जरांगे पाटील थेट क्रिकेटच्या मैदानात पोहोचले असून त्यांचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानात..

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी (२४ डिसेंबर) सकाळी अंतरवाली सराटी येथील सभेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा सराव केला. यावेळी जरांगे पाटलांनी बॉलिंग आणि बॅटिंग देखील केली. गावातील तरुण मुलांनी देखील क्रिकेटच्या मैदानावर हजेरी लावली.

तुफान फटकेबाजी, भेदक गोलंदाजी...

अंतरवाली येथील मैदानावर मनोज जरांगे हे सकाळी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी गावातील मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांनीही क्रिकेट खेळण्याचा हट्ट करत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला यावेळी मुलांनी जरांगे यांच्या सोबत फोटो सेशन देखील केले. जरांगे पाटलांच्या या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत धडकणार मराठा वादळ...

दरम्यान, शनिवारी (२३, डिसेंबर) बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा झाली. या सभेतून त्यांनी २० जानेवारीपासून मुंबईच्या आझान मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा केली. याआंदोलनात १० लाख गाड्या सहभागी होणार असून तीन कोटी मराठा बांधव मुंबईला धडकणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT