Manoj Jarange Patil Protest Latest Update
Manoj Jarange Patil Protest Latest Update Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Protest: अखेर १७ व्या दिवशी उपोषण मागे... CM शिंदेंची यशस्वी मध्यस्थी; काय म्हणाले जरांगे पाटील?

माधव सावरगावे

Manoj Jarange Patil Protest:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनीउपोषण सुरू केलं आहे. उपोषणाच्या १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मुख्यमंत्र्याच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर उपोषण सोडले आहे. मात्र असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. "मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तशीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

"मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचे आहे. हे आरक्षण मिळवल्याशिवाय मी मागे हटणार नाही, मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देवू शकतात असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे आदी नेते यावेळी उपस्थित होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, मतदान करा... अन्यथा तुमचेही नाव यादीत येईल, वाचा जिल्हाधिका-यांचा आदेश

Leopard Attack : बाजारी राखयला गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिलेचा मृत्यू, जुन्नरमध्ये आठ दिवसात दुसरी घटना

Pranit Hatte : हॉटेलमध्ये एन्ट्री नाकारल्यामुळे तृतीयपंथीय अभिनेत्री संतापली, म्हणाली, "आम्ही इथे वायफळ किंवा घाणेरडंही काम करायला..."

IND vs PAK, T20 WC 2024: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

EAC-PM Report : लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकसंख्येच्या अहवालावरून राजकारण तापलं; रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT