आ.रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला जल पूजन सोहळा  ओंकार कदम
महाराष्ट्र

आ.रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला जल पूजन सोहळा

सातारच्या माण-खटाव भागाला, तुटका तलाव या परिसरात तारळी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदाच खळखळल्याने दुष्काळी भागातील जनतेला आता आशेचा किरण मिळाला आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजेच माण-खटाव, हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पण आता तुटका तलाव या परिसरात तारळी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदाच खळखळल्याने दुष्काळी भागातील जनतेला आता आशेचा किरण मिळाला आहे.

हे देखील पहा -

आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये येथे जलपूजनाचा सोहळा पार पडला. मात्र, पाण्याचे श्रेय लाटण्याची एक अनोखी स्पर्धाच या भागात लागली आहे. याच पाण्याचे ज्या ठिकाणी रोहित पवारांनी पूजन केले, तिथेच माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी सर्वप्रथम जलपुजन केले होते.

त्या पाठोपाठच रासपचे अध्यक्ष आणि आमदार महादेव जानकर यांनीही जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या उपस्थित जलपुजन केले होते. भाजप, रासप त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोप कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maharashtra Dasara Melava Live Update : नारायण गडावरील दसरा मेळाव्याला मनोज जरांगे पाटील बारा वाजता संबोधित करणार

Maggi Recipe : पहाडी-स्टाइल चटकदार मॅगी घरीच १० मिनिटांत बनेल, फक्त फॉलो करा 'ही' रेसिपी

Mahatma Gandhi Jayanti Marathi Wishes: महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा आणि मेसेजस

Gold Rate Today: सुवर्णनगरीत दसऱ्याला सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग; वाचा आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT