Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters Reiki Case
Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters Reiki Case Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: RSS मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याची रवानगी पुलवामा कारागृहात

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) दहशतवाद्याची नागपूर कारागृहातून (Nagpur Jail) पुलवामा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. जैश ए मोहम्मद या पाकिस्तानातील (Pakistan) दहशतवादी संघटनेचा म्होरक्या उमर याचा पुलवामा येथील हस्तक रईस अहमद शेख (Terrorist Rais Ahmed Sheikh Asadullah Sheikh ) याने संघ मुख्यालयाच्या रेकीचे काम केले होते. रईस अहमद शेख याने तीन दिवस नागपूरात मुक्काम करून संघ मुख्यालयाची रेकी केली होती. याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी रईस शेखला अटक केली होती. त्यांनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी रईस याला महाराष्ट्र एटीएसकडे सोपविले होते. आता दोन आठवडे नागपूर कारागृहात राहिल्यानंतर दहशतवादी रईस अहमद शेख याची रवानगी पुलवामा येथील तुरुंगात करण्यात आली आहे. (Terrorist Raees Ahmad Shaikh Who Was Done Reiki Of RSS Headquarters In Has Been Shifted To The Pulwama Jail from Nagpur Jail)

हे देखील पाहा -

नेमकं काय आहे प्रकरण?

रईस अहमद शेख या दहशतवाद्याने नागपूरात संघ मुख्यालय परिसराची रेकी केली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून ही रेकी करण्यात आली होती. १३ ते १५ जुलै २०२१ दरम्यान संघ मुख्यालय (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters) परिसराची रेकी केल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. नागपूरात येऊन रईस शेख याने संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर (Smruti Temple) परिसराची रेकी केली होती. याबाबत नागपूरात कोतवाली पोलिसांनी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरमध्ये जाऊन रईस शेखला अटक केली. नागपूर एटीएसने दहशतवादी रईस शेखची कसून चौकशी केली होती. (Nagpur ats arrested a terrorist who was done reiki of RSS headquarters)

संवेदनशील भाग

संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांचं (Mohan Bhagwat) वास्तव्य असतं. शिवाय संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि भाजप (BJP) नेत्यांचा या परिसरात वावर असतो. यापूर्वीही संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. संघ मुख्यालयाचा अतिशय संवेदनशील वास्तूंमध्ये समावेश होतो. संघ मुख्यालयासह नागपुरातल्या (Nagpur) अनेक महत्त्वाच्या भागांची रेकी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांनी या सर्व भागातला बंदोबस्त वाढवला होता. पोलीस या भागातल्या हालचालींवर नजर ठेऊन होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Weight Loss : झटपट वजन कमी करायचंय? मग आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा, झिरो फिगर मिळेल

Bear Attack : तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या इसमावर अस्वलाचा हल्ला; हल्ल्यात ६० वर्षीय इसम गंभीर जखमी

Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

Dhananjay Munde On Uddhav Thackeray | मुंडेंचा फोन ठाकरेंनी टाळला! किस्सा काय?

SCROLL FOR NEXT