महापूजेसाठी विठ्ठल मंदिरातील 45 कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक भारत नागने
महाराष्ट्र

महापूजेसाठी विठ्ठल मंदिरातील 45 कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक

येत्या 20 जुलै रोजी दक्षिण काशीत पंढरीत आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. यावर्षी आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या उभयतांच्या हस्ते होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागने

पंढरपूर: येत्या 20 जुलै रोजी दक्षिण काशीत पंढरीत आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. यावर्षी  आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या उभयतांच्या हस्ते होणार आहे. महापूजेवेळी त्यांच्या सोबत विठ्ठल मंदिरातील 45 कर्मचाऱ्यांना उपस्थितीत राहण्याची  परवानगी देण्यात आली असून त्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. महापूजेवेळी उपस्थित राहणाऱ्या मंदिर समिती व सल्लागार समिती सदस्यांनाही लसीकरण करुन घेण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरण केल्याशिवाय कोणालाही मुख्यमंत्र्या महापूजेसाठी  मंदिरात  प्रेवश दिला जाणार नाही,अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी वारीचा सोहळा प्रतिकात्मक पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक महापूजा 20 जुलै रोजी पहाटे अडीच वाजता होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेसाठी मोजके कर्मचारी व समिती सदस्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मंदिर समितीच्या 277 कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी फक्त 45 कर्मचाऱ्यांना मंदिरात महापूजेसाठी उपस्थित राहता येणार आहे. जे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत,अशा कर्मचाऱ्यांचे कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच् लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

शिवाय मंदिर समिती सदस्य व सल्लागार समिती सदस्यांनाही लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधीत सदस्यांना तशा लेखी सूचना देखील दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंदिर समितीला मिळाल्या आहेत. त्यानुसार मंदिर समितीने तयारी सुरु केली आहे. आषाढी एकादशीपूर्वी विठ्ठल मंदिरासह

परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. मंदिरातील कर्मचार्यांची कोरोना चाचणी देखील केली जाणार आहे. मंदिरात नियमित सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून आता पासूनच मंदिरात कोरोना नियमांचे तंतोतंत पालन सुरु केल्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

हाफिज सईद पुन्हा भारतावर हल्ल्याच्या तयारीत, बांगलादेशातून...., 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ

Healthy Chaat: चटकदार अन् कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेय? जंक फूड सोडा, घरीच तयार करा 'हा' पदार्थ, लहान मुलंही आवडीनं खातील

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, हे काम कराच, अन्यथा ₹ १५०० रूपये होतील

SCROLL FOR NEXT