सांगलीत पूर येऊन 9 दिवस झाले; अध्याप शेतीचे पंचनामे नाही  Saam Tv
महाराष्ट्र

सांगलीत पूर येऊन 9 दिवस झाले; अध्याप शेतीचे पंचनामे नाही

सांगली जिल्ह्यात (Sangali District) तिसऱ्यांदा महापूर आला, आणि होत्याच नव्हतं झालं. आधीच कोरोनाचा (Coronavirus) फटका आणि त्यात महापूर आला.

विजय पाटील

सांगली जिल्ह्यात (Sangali District) तिसऱ्यांदा महापूर आला, आणि होत्याच नव्हतं झालं. आधीच कोरोनाचा (Coronavirus) फटका आणि त्यात महापूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. मात्र नेते मंडळी दौरे करत आहेत. मात्र मदत कधी मिळणार या विवंचनेत शेतकरी आहेत. तब्बल नऊ दिवस झाले अध्यप पंचनामे झालेच नाहीत.

सांगली जिल्ह्यात 2005 ला पहिला पूर आला. त्यानंतर 2019 ला आणि आता 2021 ला महापूर आला. याचा फटका सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आधीच 2019 ला महापूर आला. त्यातून सांगली सावरत होती. त्यातच कोरोनाने गाठले आणि लगेच 2021 चा महापूर यात शेतकरी आणि नागरिक खचला आहे.

सांगलीला महापूर आल्याने ग्रामीण भागातील तब्बल 108 गांव बाधित झाली. तर अनेक गावांना पुराचा वेढा घातला होता. या पुरात अनेकांचं संसार उघड्यावर पडले तर अतोनात नुकसान झाले. त्यातच शेतीला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती सुद्धा वाहून गेली आहे. ऊस, सोयाबीन, पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

पूर येऊन तब्बल नऊ दिवस झाले पण अध्यप ही शेतकऱ्याच्या बांधावर शासकीय अधिकारी पोहचले नाहीत. कोणतेही पंचनामे झाले नाहीत. शेतकरी शासनाच्या मदतीची आस धरून बसला आहे.

एकीकडे पूर येऊन गेल्यावर अनेक नेते मंडळी पूर पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात दौरे करत आहेत. अनेकांनी आश्वासन दिले आहेत. पण शेतकऱ्याला काही मदत मिळेना झाली आहे. माय बाप सरकार शेतकऱ्याला पॅकेज जाहीर करेल याची आस धरून बसला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT