Sameer Wankhede-Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sameer Wankhede News: IRS समीर वानखेडेंचंही ठाकरे गटावर तोंडसुख; सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स घेणारे कुठे आहेत? राऊतांना डिवचलं

सांगलीत आयोजित श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या आयोजित कार्यक्रमात समीर वानखेडे बोलत होते.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

>> विजय पाटील

सांगली : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण देखील राहिला नाही. पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदे गटाचं असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या निकालानंतर विरोधक ठाकरे गटावर अक्षरश: तुटून पडले आहेत. यात आता IRS समीर वानखेडे यांची भर पडली आहे.

माझ्यावर आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत? सर्वांना माहीत आहे,अशी टीका समीर वानखेडे यांनी केली आहे. सांगलीत आयोजित श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगलीमध्ये दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यूपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले,माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेह गेले. माझी जात काढली.मात्र त्यांना काही सापडले नाही. लोकांना काही काम नसते तेव्हा बाष्कळ चर्चा सुरू होते. मीडिया, घाणेरडे राजकारणी, सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेणारे (Sanjay Raut) काही नेते आरोप करायचे.

तेव्हा मला लोक म्हणायचे तुला झोप येते का? तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचो आणि सर्व भीती निघून जायची. वाटायचे कितीही मंत्री,मंत्रालय येऊ दे हे तर किरकोळ आहेत.त्यामुळे तुमचे आदर्श महापुरुष असले पाहिजेत,असं मत वानखेडे यांनी व्यक्त केलं.

मुंबईतील शिपवर रेड झाल्यानंतर घाणेरडे राजकारणी आपल्यावर टीका करत होते. यातून आमचे खच्चीकरण झाले होते. मात्र शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना धावून आली आणि आज मी इथे आहे. पण माझ्यावर आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत. ते सर्वांना माहित आहे,असा टोला समीर वानखेडे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT