Cm Eknath Shinde
Cm Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus Booking: प्रवाशांसाठी खुशखबर! IRCTC च्या वेबसाईटवर आता ST बसचं आरक्षण, शिंदे सरकारचा महत्वपूर्ण करार

Vishal Gangurde

एसटी आरक्षण (ST Bus Reservation Update)

एस बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खुशखबर हाती आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचं आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानावर एसटी महामंडळ आणि इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. यांच्यादरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर प्रवाशांना एसटीचे तिकीटाचेही आरक्षण करता येणार आहे.

रेल्वेचे एकूण ७५ टक्के प्रवासी रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनवर तिकीट आरक्षित करतात. आता यात एस प्रवाशांचीही भर पडणार आहे. आता एसटी बसचेही तिकीट आरक्षित करणे शक्य होणार आहे.

शिंदे सरकारच्या करारमुळे एसटी बसच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे आणि एसटी बसच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

SCROLL FOR NEXT