Vishwas Nangare Patil appointed Nagpur Police Commissioner 
महाराष्ट्र

डॅशिंग IPS विश्वास नांगरे पाटलांची बदली, आता नागपूरमध्ये मिळाली नवी जबाबदारी, पाहा लेटेस्ट अपडेट

Vishwas Nangare Patil appointed Nagpur Police Commissioner : डॅशिंग आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

IPS Vishwas Nangare Patil Appointed Nagpur Police Commissioner : महाराष्ट्र पोलीस दलातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी (CP) नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अप्पर पोलीस महासंचालकपदी (अतिरिक्त महासंचालक) बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे येत्या गुरुवारी (२५ जून) सकाळी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचे समजतेय.

२६/११ हल्ल्यातील 'हिरो' नागपुरात!

विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि धडाडीच्या कामगिरीसाठी ओळखले जातात. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी केलेल्या धडक कारवायांमुळे त्यांची एक स्वतंत्र आणि कडक ओळख निर्माण झाली आहे.

विश्वास नांगरे पाटलांसमोर कोणती आव्हाने ?

देशातील हत्यांच्या (Murders) आकडेवारीनुसार नागपूर शहर दुसऱ्या क्रमांकावर असल्याने, शहरातील गुन्हेगारीचा आलेख खाली आणणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.तरुण पिढीला विळखा घालणाऱ्या 'एमडी ड्रग्ज' (MD Drugs) तस्करांचे कंबरडे मोडणे, तसेच शहरातील संघटित गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांविरोधात कठोर मोहीम उघडणे. गुंतवणुकीच्या नावाखाली सर्वसामान्यांची होणारी मोठी आर्थिक फसवणूक रोखणे आणि सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे. वेगाने विकसित होणाऱ्या नागपूर शहरात गुन्हेगारीचे स्वरूपही हायटेक आणि आधुनिक होत चालले आहे, त्यावर वचक निर्माण करणे.

नागपूर पोलीस दलात आणखी मोठे फेरबदल

नागपूरच्या पोलीस आयुक्तपदासोबतच शहरातील पोलीस दलात इतरही महत्त्वाचे अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. नागपूर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) पोलीस उपायुक्त (DCP) शशिकांत सातव यांची आता छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर शहरात नवे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश धुमाळ यांना नागपूरचा चांगला अनुभव असून, यापूर्वी त्यांनी नागपूर ग्रामीणमध्ये 'अप्पर पोलीस अधीक्षक' (अप्पर एसपी) म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रुग्णालय मारहाण प्रकरण: रमेश म्हात्रे यांना मोठा दिलासा, कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर

बुधवारी राज्यात कुठे कुठे पाऊस? आठवडाभराचा IMD चा अंदाज समोर, तुमच्याकडे पाऊस पडणार का?

Masala Sandwich Pav Recipe : पावसात घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल झणझणीत मसाला सँडविच पाव, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

कर्जमाफीच्या निकषात महत्वाचे बदल, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आणखी 23 लाख शेतकऱ्यांना फायदा

Joint Pain : एक कप चहाने सांधेदुखीपासून मिळेल आराम

SCROLL FOR NEXT