Amravati News
Amravati News Saam TV
महाराष्ट्र

Amravati News : काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद; जिल्हाध्यक्षांकडून खासदाराची काँलर खेचण्याची भाषा

साम टिव्ही ब्युरो

Amravati News: कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमूख यांनी लोकसभा निवडणुकीत मोठी मेहनत घेतली. त्यांनी घेतलेल्या मेहनतीने जिल्ह्यात कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारकीत विजय मिळवला. परंतु निवडून आलेल्या खासदार मॅडम दोन महिने सुद्धा आपल्या सोबत राहिल्या नाहीत म्हणून आता आपल्या हक्काचा खासदार, आपल्या चिन्हाचा खासदार केव्हाही आपण कॉलर पकडून आणू शकतो असा खासदार, लोकसभेचा उमेदवार बळवंत वानखडेच होऊ शकतात असे धक्कादायक वक्तव्य दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या विषयी कॉग्रेसचे जिल्हाअध्यक्ष बबलू देशमुख यांनी भर सभेत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी अमरावती (Amravati) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून नया अकोला पर्यंत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेदरम्यान नया अकोला येथे आयोजित सभेमध्ये मंचावर माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यासह जिल्ह्यातील कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बबलू देशमुख यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या मागासवर्गीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.

आपल्या चिन्हाचा खासदार (MP) केव्हाही आपण कॉलर पकडून आणू शकतो, असे वक्तव्य केल्याने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमूख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आमदार बळवंत वानखडे यांची या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया असणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

SCROLL FOR NEXT