मेघा, पूर्णा नदीवरील पुलावर लोखंडी कठडे बसवा; वाहनधारकांची मागणी अरुण जोशी
महाराष्ट्र

मेघा आणि पूर्णा नदीवरील पुलावर लोखंडी कठडे बसवा; वाहनधारकांची मागणी

शिरजगाव कसबा येथून वाहणाऱ्या मेघा नदी आणि पूर्णा या दोन्ही नद्यांवरील मोठ्या पुलाला कठडे नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अरुण जोशी

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथून वाहणाऱ्या मेघा नदी व ब्राह्मणवाडा थडी गावापासून वाहणाऱ्या पूर्णा या दोन्ही नदीवरील मोठ्या पुलाला कठडे नसल्यामुळे व पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना पुलावरून जाताना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. संबंधित बांधकाम विभागाने याची दखल घेत दोन्ही पुलांवर लोखंडी कठडे बांधण्याची मागणी परिसरातून होत आहे. (Install iron bars on the bridges over the Megha and Purna rivers; Demand of vehicle owners)

हे देखील पहा -

मध्यप्रदेश बैतुल जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील सातपुडा पर्वतरांगांमधून उगम असणाऱ्या मेघा व पूर्णा दोन्ही नदी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यावर दुथडी भरून वाहतात. प्रसंगी पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे या राज्य महामार्गावरील वाहन चालकाला पुलाला कठडे नसल्यामुळे संध्याकाळी नदीवरील पाण्याचा प्रवाह पुलाखाली किती आहे व पुलाची सीमा हद्द याचा अंदाज घेता येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यवतमाळ जिल्ह्यात पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बसच्या झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती येथे होऊ नये यासाठी संबंधित बांधकाम विभागाने पुलाच्या मार्गावरील दोन्ही बाजूला वाहन चालकांसाठी सूचना फलक व कठडे लावणे नितांत गरजेचे असल्याचा सूर वाहनचालकांसह नागरिकांमधून उमटत आहे.

मेघा नदीच्या पुलावर कठड्यांची आवश्यकता

शिरसगाव कसबा येथील मेघा नदीवरील पूल हा उंचीने कमी असून त्याला कठडे नाहीत. तसेच पुलावर पडलेले मुख्य मार्गावरील खड्डे नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या जीवितास धोकादायक आहेत. त्यासाठी या पुलावर कठड्यांची नितांत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया शिरजगाव कसबा गावचे सरपंच प्रवीण खेरडे यांनी यावेळी दिली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT