लेखक आणि संपादक गिरीश कुबेरांवर शाईफेक; नक्की काय आहे वाद? Saam TV
महाराष्ट्र

लेखक आणि संपादक गिरीश कुबेरांवर शाईफेक; नक्की काय आहे वाद?

समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : नाशिकमध्ये आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या संमेलनामध्ये जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संमेलन परिसरात शाई फेक केली आहे. संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या ही घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या पुस्तकावरून वाद असल्याचं संभाजी ब्रिग्रेडकडून सांगण्यात आलं आहे. समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गिरीश कुबेर यांनी लिहलेलं ‘Renaissance State’ या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. आणि याच पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा ठपका ठेवत संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केले आहे. अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची मागणी देखील या अगोदर करण्यात आली होती.

हा आहे वाद?

गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण केलं असल्याचा दावा करण्यात येत आहे. संभाजी महाराजांनी आईची हत्या केली, महादजी शिंदेंची बदनामी केली, असा संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील पत्र लिहून लेखक कुबेर यांचा जाहीर निषेध याआधी नोंदवला होता. या पुस्तकावर कायमची बंदी आणावी अशी मागणी वारंवार करण्यात विविध संघटनांनकडून करण्यात येत आहे. या पुस्तकाचे प्रकाशक HarperCollins Publishers यांना देखील या पुस्तकाच्या प्रती बाजारातून मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, HarperCollins Publishers प्रकाशन संस्था ही आंतरराष्ट्रीय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी आणायची असल्यास त्याबाबत काही मर्यादा आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bank Holiday in November : नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी...

PSI Gopal Badne: महिला डॉक्टरवर चारवेळा बलात्कार करणारा कोण आहे PSI गोपाल बदने? VIDEO

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पावसाचा हाहाकार

Sachin Sanghvi Arrested: २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला अटक

SCROLL FOR NEXT