सातारा : वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांचा लडाख याठिकाणी हवामानातील बदलामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांची लडाख या ठिकाणी नेमणूक होती. यावेळी हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागला. यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.
हे देखील पहा-
परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती सायंकाळी कुटूंबियांना कळविण्यात आली आहे. देशसेवा करत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीर मरण आले आहे. वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. आसले (ता वाई )येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधू असलेले महेश मांढरे यांना देखील याची माहिती कळविण्यात आली आहे.
सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि ८ वर्षाचा मुलगा व फक्त १० महिन्याची मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव उद्या पहाटे दिल्ली या ठिकाणी पोहोचणार आहे. सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात असले या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.