महाबळेश्वरमध्ये नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी : डॉ. नीलम गोऱ्हे  SaamTvNews
महाराष्ट्र

महाबळेश्वरमध्ये नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी : डॉ. नीलम गोऱ्हे

महाबळेश्वर हे पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचे माहेरघर व्हावे असे प्रतिपादन नीलम गोऱ्हे यांनी केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाबळेश्वर : केवळ राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातून पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे गीरिस्थान महाबळेश्वर ठिकाण आहे. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. यामुळे महाबळेश्वर हे पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचे माहेरघर व्हावे असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. महाबळेश्वर येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

हे देखील पाहा :

महाबळेश्वर येथे भेट देणारे पर्यटकांसाठी पुरेशा प्रमाणात शौचालये, नागरी सुविधा असल्या पाहिजेत. वेण्णा लेक परिसरात प्रस्तावित रस्त्यांच्या रुंदीकरण कामाला गती यावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असे यावेळी त्या म्हणाल्या. महाबळेश्वर येथील पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने महाबळेश्वर नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रासाठी एकूण १७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत लवकरच येथे विकासकामांचा श्री गणेशा पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या अनुषंगाने राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथे नियोजन बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'महाबळेश्वर आणि परिसरातील गावांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कृषी पर्यटन, न्याहारी निवास योजना, खादी ग्रामोद्योग सारख्या अनेक योजनांचा लाभ लोकांनी घ्यावा याकरिता प्रशासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे'.

उदय सामंत यांनी येथे असलेल्या विविध विकास कामांसाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पर्यटक आणि त्या माध्यमातून होत असलेल्या या ठिकाणच्या प्रसिध्दी बाबत त्यांनी आज लक्ष वेधले. महाबळेश्वर येथील सुविधांबाबत त्यांनी आज नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या. येत्या सोमवारी दिनांक ९ मे, २०२२ रोजी सातारा येथे आयोजित बैठकीत डॉ. नीलम गोऱ्हे याबाबत अनेक विषयांचा आढावा घेणार आहेत.

या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडू सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, महाबळेश्वर तहसीलदार सुषमा पाटील, गटविकास अधिकारी अरुण मारभळ, नायब तहसीलदार दीपक सोनवले आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT