Indurikar Maharaj News Saam TV
महाराष्ट्र

Indurikar Maharaj: मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; कीर्तन अन् कार्यक्रमांबाबत घेतला मोठा निर्णय

Indurikar Maharaj Support Maratha Reservation: त्यामुळे उद्यापासून पुढचे ५ दिवस एकही कार्यक्रम व कीर्तन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Ruchika Jadhav

सचिन बनसोडे

Maratha Reservation:

संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्ती त्यांना पाठिंबा देतायत. अशात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी देखील मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत उद्यापासून पुढचे ५ दिवस इंदुरीकर महाराजांचे सर्व कार्यक्रम रद्द झालेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इंदुरीकर महाराज जरांगेंच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे उद्यापासून पुढचे ५ दिवस एकही कार्यक्रम व कीर्तन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळालीये.

जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आर या पार अशी लढाई सुरू केलीये. आमरण उपोषणाचा त्यांचा आजचा ६ वा दिवस आहे. जरांगे यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती आणखीन खालावत चालली आहे. वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिलाय.

जरांगे पाटलांच्या या लढ्यात मराठा तरुणांसाह महिलांनी देखील उपोषणाला सुरुवात केलीये. गावागावात महिला साखळी उपोषण करत आहेत. यासह सोलापुरमधून विष्णू पवार हे ८५ वर्षांचे आजोबा देखील आमरण उपोषणाला बसलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT