Kirtankar Indurikar Maharaj  Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घाला, इंदुरीकर महाराजांनी का केली मागणी ?

Indurikar Maharaj Mobile Ban Schools Maharashtra: राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालावी, अशी ठाम मागणी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि परीक्षांवर मोबाईलचा परिणाम यावर त्यांनी परखड भाष्य केले.

Omkar Sonawane

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला: तरुणांसह शेतकऱ्यांच्या पोरांना प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकरांनी एक तळमळीचं आवाहन केलं आहे. पोरांनो मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका, आजकाल लिहिणाऱ्या पेनमध्ये कॅमेरा आहेत. टपरी पेटवातांना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर, 10 वर्षांची शिक्षा आहे. कारण आतापर्यत दंगलीमध्ये गरीबांचे पोर आत गेले, मोठ्यांचे गेले नाही, कधी जाऊ देणारही नाहीत. ते तुमचा वापर फक्त 'युज अँड थ्रो' म्हणून करणार, असे कीर्तनकार इंदूरकरांनी युवकांना ठणकावून सांगितलं. आज कोणतही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो, म्हणून पाया पडतो सर्व पोरांच्या दंगलीच्या भानगडीत पडू नका, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, बारावी आणि दहावीची परीक्षा तोंडावर आहे, मुले काहीच अभ्यास करेना. त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये आहे. परीक्षावेळी खिडकीतून चिट्ठी घ्यायच्या आणि शिक्षकांना दम द्यायचा, आजच्या 40 टक्के मुलांची अशी परिस्थिती आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमावली आणली पाहिजे. परीक्षा काळात 'मोबाईल'वर बंदी घातली पाहिजे’, अशी मागणी इंदुरीकर महाराजांनी केली.

त्यांनी मुलींबद्दल विधान करीत थेट 'खुलं चॅलेंज' दिलं. आजकालच्या मुली प्रेमात हुशार नव्हे तर दरिद्री पोर निवडतात. ते पोर विहिरीवरच्या मोटरी, केबलच्या तार आणि मोटरसायकलच्या पार्ट चोरणारी असता. जर एखादी मुलगी दरिद्री मुलासोबत पळून गेली आणि ती आयुष्यभर सुखी झाली, अशा एकीने येऊन सांगावं, असं झालं असेल तर पुढचे 6 महिने आपण तिच्या घरी धुणीभांडी घासणार. आज आईच्या डोळ्यात पाणी आणि वडिलांची मान खाली घालवणारी मुलगी कधीच सुखी राहू शकणार नसल्याचं इंदोरीकर म्हणाले.

आज 31 वर्ष आयुष्य लोकांच्या शिव्या खान्यात गेलंय. प्रत्येक माणसाने शिव्या घातल्याये, म्हणून थोड्याकरिता कशाला बंद घालायाचं, असं ठरवलंय.. पण खरं बोलतोय म्हणून लोक आपल्या बोकांडी बसतात. आज हायवेच्या बाजूने ज्यांना जमिनी विकल्या त्यांनी हॉटेल टाकले, आणि जमिनी विकणारे त्याच हॉटेलात मजूर झाले. दुसरीकडे पहिले तर निम्मे ग्रामपंचायत सदस्य अंगठे बहाद्दर आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

SCROLL FOR NEXT