Indore Amalner Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Indore- Amalner Bus Accident: दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक व जखमींना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर

दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक व जखमींना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : इंदूरहून अमळनेर येत असलेल्‍या महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसला अपघात झाला. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन आणि धार जिल्ह्याच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे. या अपघातातील (Accident) मृतांच्‍या नातेवाईक व जखमींना पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर करण्यात आली आहे. (Indore Amalner Bus Accident)

महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाची बस (MSRTC Bus) सकाळी इंदूरहून अमळनेरला (Amalner) येत असताना खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या खलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी होते. यात १३ प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे. मृतांमधील काहींची ओळख पटली आहे. या अपघातातील मृतांचे नातेवाईक व जखमींना राज्‍य सरकारने मदत जाहीर केल्‍यानंतर पंतप्रधान कार्यालयाने देखील मदत जाहीर केली आहे.

प्रत्‍येकी दोन लाखाची मदत

मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. तर यातील जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT