indore Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

इंदोर-अमळनेर बस अपघाताचा चौकशी अहवाल सादर, 'या' कारणामुळे झाली दुर्घटना

इंदोर-अमळनेर बस अपघाताचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मध्यप्रदेश : इंदोरहून अमळनेरकडे जाणाऱ्या एका (Indore Bus Accident) बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. ही बस धारमध्ये पुलावरुन थेट नर्मदा नदीत (Narmada River) कोसळली होती. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता. दरम्यान, या गंभीर घटनेची राज्य सरकारने (Maharashtra Government) तातडीनं दखल घेवून मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. तसेच बस दुर्घटनेबाबत राज्य सरकारकडून चौकशी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर इंदोर-अमळनेर बस अपघाताचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. ट्रकला ओव्हरटेक करताना बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बस ताशी ४५ किमी वेगाने धावत होती. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचाही दावाही केला जात आहे.

नर्मदा नदीत पुलावरून इंदूर- अमळनेर बस कोसळली होती. या बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील दोघांचा समावेश असल्‍याची माहिती समोर आली होती. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील धार येथे झालेल्या इंदोर- अमळनेर (Amalner) बसच्या दुर्घटनेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मृतांमध्ये नऊ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. मृतांमध्‍ये धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका येथील दोघा जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली होती.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT