APMC Market , Onion saam tv
महाराष्ट्र

Onion Global Market News: जागतिक बाजारात पाकिस्तानी कांद्याला मागणी वाढली, भारतीय कांदा पडतोय मागे; नेमकं कारण काय?

Indian Onion In Global Market: केंद्र सरकारची चुकीची धोरणे आणि जाचक अटींमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशातच आता जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची पाकिस्तानच्या कांद्याशी स्पर्धा सुरू असून पाकिस्तानच्या कांद्याला मागणी वाढली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. २७ जुलै २०२४

केंद्र सरकारची चुकीची धोरणे अन् अटी शर्तींमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशातच आता जागतिक बाजारातही भारतीय कांद्याची पिछेहाट झाली असून पाकिस्तानच्या कांद्याला मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे. जाचक अटींमुळे भारतीय कांद्याला तोटा सहन करावा लागत असून पाकिस्तानच्या कांद्याला पसंती दर्शवली जात आहे.

भारत हा कांदा निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारची चुकीची धोरणे आणि जाचक अटींमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशातच आता जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची पाकिस्तानच्या कांद्याशी स्पर्धा सुरू असून पाकिस्तानच्या कांद्याला मागणी वाढली आहे.

भारतीय कांद्यावर जाचक अटी शर्ती असल्याने ५६ रुपये किलोने निर्यात होत आहे. तर निर्यातीला अटी शर्ती नसल्यानं २८ रुपये किलोने पाकिस्तानच्या कांद्याची निर्यात होत आहे. त्यामुळे भारताच्या तुलनेत दर कमी असल्यानं जागतिक बाजारात पाकिस्तानी कांद्याला मागणी वाढली असून प्रत चांगली असूनही दर जास्त असल्यानं जागतिक बाजारात भारतीय कांद्याची पिछेहाट झाली आहे.

किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्काचा कांदा निर्यातीला फटका बसत असून प्रतवारी कमी असली तरी भारतीय कांद्यापेक्षा दर कमी असल्यानं पाकिस्तानच्या कांद्याला मागणी जास्त आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे मागील ४ महिन्यात भारतीय कांद्याची केवळ १२ टक्के निर्यात झाली आहे. मागील वर्षात देशाची कांदा निर्यात १३ टक्क्यांनी घटल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT