indian medical association demands to arrest dr suraj rupnar in rucha rupnar case sangola Saam Digital
महाराष्ट्र

डॉ. सूरज रुपनरला तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभरात निदर्शनं करण्याचा आयएमएचा इशारा

indian medical association demands to arrest dr. suraj rupnar in rucha rupnar case: पंढरपूर येथील आयएमएच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेंची भेट घेत निवेदन दिले.

भारत नागणे

डॉ. ऋचा रुपनर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले डॉ. सुरज रुपनर यास पोलिसांनी तात्काळ अटक न केल्यास इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा पंढरपूर आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारंडे यांनी दिला आहे. आज आयएमएने पंढरपूर येथे काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नाेंदविला.

डॉ. ऋचा रुपनर यांनी त्यांचे पती डॉ. सुरज यांच्या जाचास कंटाळून 6 जूनला घरी आत्महत्या केली. त्यानंतर 3 दिवसांनी सांगोला पोलिस ठाण्यात डाॅ. सूरज रुपनर याच्यावर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला.

दरम्यान डाॅ. सूरज यास अद्याप अटक न झाल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सूरज रुपनर यास अटक करावी, त्याचा पासपोर्ट जप्त करावा अशी मागणी आज आयएमएने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी आयएमएने राज्यभरात पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गाडीवर पोलिसांचा फास; उसाच्या शेतातून कार जप्त|VIDEO

Maharashtra Live News Update : बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं हाता-पायांवर सर्वात आधी दिसतात? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Virar Tourism : विरारमध्ये लपलंय एक सुंदर लोकेशन, जे पाहताच तुम्ही कुल्लू मनाली विसराल

Baklava Recipe: बिग बॉस फेम तान्या मित्तलला आवडणार बकलावा कसा करायचा घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT