Railway News Saam tv
महाराष्ट्र

Railway News : पुण्यासाठी रेल्वेचं गिफ्ट.. दिवाळी अन् दसऱ्यात धावणार विशेष ३०० गाड्या, वाचा सविस्तर

Maharashtra News : दिवाळी आणि छटपूजेसाठी पुण्यातून तब्बल ३०० विशेष गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान नागपूर, लातूर आणि उत्तर भारतासाठी विशेष फेऱ्या धावणार आहेत.

Alisha Khedekar

  • पुण्यातून दिवाळी व छटपूजेसाठी ३०० विशेष गाड्यांची घोषणा

  • नागपूर व लातूरसाठी सर्वाधिक ९४ फेऱ्या निश्चित

  • २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान गाड्या धावणार

  • प्रवाशांना ऑनलाइन आरक्षणाला प्राधान्य द्यावे, अशी रेल्वेची विनंती

दिवाळी आणि छटपूजा या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा मोठा ओघ पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी परततात. उत्तर भारतातूनही हजारो प्रवासी महाराष्ट्रात ये जा करतात. या वाढत्या गर्दीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने यंदा विशेष तयारी केली असून पुण्याहून राज्यातील विविध भागांसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांकडे तब्बल ३०० विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर आणि नागपूरकडे सर्वाधिक प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन ९४ विशेष फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या गाड्या पुणे, हडपसर आणि खडकी स्थानकांहून सुटणार असून, दौंड, मनमाड, भुसावळ, झाशी, गोरखपूर अशा प्रमुख ठिकाणी थांबे देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांची सेवा २६ सप्टेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढविण्याबरोबरच प्रवाशांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुपरफास्ट गाड्याही चालविण्याचे ठरविले आहे. याशिवाय गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त डब्यांचा समावेश करण्यात येणार आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांकडे जाणारे प्रवासी लक्षात घेऊन विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या सुट्टीत पुण्यातून हजारो विद्यार्थी, नोकरदार, कामगार आपल्या गावी परततात. तर छटपूजेच्या निमित्ताने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. त्यामुळे प्रत्येक वर्षी पुणे रेल्वे स्थानक, हडपसर, खडकी या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळते. गाड्यांमध्ये उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते. या परिस्थितीवर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील प्रवाशांचा मोठा ताण कमी होणार असून, दिवाळी व छटपूजा साजरी करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या हजारो नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

SCROLL FOR NEXT