Indian Army soldier Sachin Rathod Saam
महाराष्ट्र

वीर जवान सचिन राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार; परभणीवर दुःखाचा डोंगर

Sachin Rathod Indian Army soldier : परभणीतील गंगाखेड येथील वीर जवान सचिन राठोड यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Namdeo Kumbhar

विशाल शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी परभणी

Indian Army soldier Sachin Rathod funeral Parbhani details : परभणीतील गंगाखेड तालुक्यातील बोर्डा गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले वीर जवान सचिन राठोड यांचे कोलकाता येथे निधन झाले. आज गंगाखेड येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील १२ वर्षे देशसेवा बजावणाऱ्या या जवानाच्या अकाली निधनामुळे संपूर्ण बोर्डा गावावर आणि परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

सचिन राठोड हे भारतीय सैन्यात मागील १२ वर्षांपासून कर्तव्य बजावत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोलकाता येथील सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

त्यांचे पार्थिव गंगाखेड येथे आणल्यानंतर शेकडो नागरिकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर गंगाखेड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर जवान सचिन राठोड यांच्या निधनामुळे बोर्डा गावाने एक धाडसी सुपुत्र गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अकोल्यात टॉवर चौकात वंचित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT