Maharashtra Weather Update News  AI Image
महाराष्ट्र

Weather Update : हवामानात मोठे बदल! ४ राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?

Maharashtra Weather Update Today News : देशातील तमिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीसह दक्षिण भारतातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सकाळी थंडी, दुपारी उकाडा आणि अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • बंगालच्या उपसागरातील दोन चक्रीवादळांमुळे देशातील हवामानात बदल

  • दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये पाऊस

  • पावसादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज

गेले काही दिवस बंगालच्या उपसागरात खवळणाऱ्या २ चक्रीवादळांमुळे देशभरात पावसाला पोषक हवामान तयार झालं. यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळलेल्या पाहायला मिळाल्या. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून ४ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र दिवसा थंडी आणि दिवसभर उकाडा जाणवत आहे.

भारतीय हवामान विभागाने आज दक्षिण भारतातील काही राज्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तमिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही आहे. पावसादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

दुसरीकडे, उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या पावसाची शक्यता कमी आहे. एकंदरीत, नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशाच्या काही भागांत पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे, तर उर्वरित भागांत कोरडे हवामान कायम आहे. नागरिकांनी आपल्या भागातील हवामानाची माहिती घेऊन नियोजन करावे.

महाराष्ट्रात सध्या हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवत असून दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभर वेगवेगळ्या तापमानाचा अनुभव येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळी थंड वातावरणामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला, तरी दुपारी वाढणाऱ्या उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही दिवसांतही हवामानात असेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लक्ष्मी पूजनानिमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Accident : धनत्रयोदशीला काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ६ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

SCROLL FOR NEXT