Opposition Meeting Latest Update SAAM TV
महाराष्ट्र

Opposition Meeting: 'INDIA' महाआघाडीची तिसरी बैठक मुंबईत; तारीखही ठरली

Opposition Parties Mumbai Meeting: या आधी विरोधकांची पहिली बैठक पाटणामध्ये तर दुसरी बैठक बेंगळुरूमध्ये पार पडली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: विरोधी पक्षांच्या आघाडीच्या दोन बैठका आत्तापर्यंत पार पडल्या आहेत. या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याबद्दलची महत्वाची माहिती समोर आली असून मुंबईत होणाऱ्या या बैठकीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईत (Mumbai) होणारी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी 26 पक्षांनी मिळून महाआघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका आत्तापर्यंत पार पडल्या. त्यामधील पहिली बैठक ही पाटणामध्ये झाली तर दुसरी बैठक बेंगळुरूमध्ये पार पडली.

बेंगळुरमधील बैठकीत या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (INDIA) असं नाव देण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत (Mumbai) होणार असून २५ आणि २६ ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार करणार आयोजन...

मोदीविरोधकांच्या या आघाडीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारही (Sharad Pawar) सहभागी असून त्यांच्याकडून या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, एकीकडे भाजपसोबत अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले असल्याने शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT