Supriya Sule On Bharat Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule On Bharat: इंडिया नाव बदलण्यासाठी १४ हजार कोटींचा खर्च; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

केंद्र सरकारने जी-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा केला होता.

Ruchika Jadhav

India Vs Bharat:

विरोधी पक्षाने आपल्या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे. या नावानंतर केंद्र सरकारने देशाचं इंडिया नाव बदलून भारत ठेवण्याच्या हालचालींना सुरुवात केल्याचं म्हटलं जातंय. केंद्र सरकारने जी-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख 'प्रेसिडेंट ऑफ भारत', असा केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Bharat News)

केंद्र सरकारने इंडिया नाव बदलून भारत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कामासाठी ते तब्बल १४ हजार रुपये कोटींचा खर्च करणार आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

देशाचे नाव इंडिया बदलून भारत असं केलं जात आहे. या वादावर सुप्रिया सुळेंनी पुढे म्हटलं की, "मोदी सरकारने इंडिया आघाडीचा इतका धसका घेतलाय की नाव बदलून टाकले आहे. ते इतका धसका घेतील असं मला वाटलं नव्हतं."

खासदार सुप्रिया सुळे आज पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने कांदा आणि टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आयात केली आहे. अशात दर पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

लोकसभेत कांद्याच्या प्रश्नावर सर्वाधिक आवाज मी उठवल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, अहिल्यानगरमधील शाळांना २ दिवस सुट्टी

Paresh Rawal: 'मी असा अभिनेता नाही, ज्याला वाटतं....'; 'हेरा फेरी ३'च्या शूटिंगबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

वक्फ कायदा कायम, ३ सदस्य राहणार बिगर मुस्लिम, पण ५ वर्षांच्या 'त्या' अटीवर SC चा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पुढे मालगाडी थांबली; CSMT कडे जाणाऱ्या ट्रेन खोळंबल्या

Bhandara Rain : भंडाऱ्याला मुसळधार पावसाने झोडपले; घरात शिरले पाणी, जीवनोपयोगी साहित्याची नासाडी

SCROLL FOR NEXT