Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचं कमबॅक, पाऊस कधी पडणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Maharashtra Rain Update: शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Rain News:

महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्याला कोणत्याही प्रकारचा अलर्ट जारी नाही, परंतु रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'यलो' अलर्ट जारी केला आहे. (Latest Marathi News)

राज्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत असून गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात ५ ते ७ दिवस पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

मराठवाड्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहे. याचदरम्यान, हवामान खात्याने मराठवाड्यात ३ दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाड्यात ६ ते ९ सप्टेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान सरासरी पावसाची शक्यता आहे.

वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस

आज वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस लांबल्याने खरीपाची पिके संकटात सापडली होती. आता पाऊस बरसल्याने पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. तसेच पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

पाऊस आल्याने ढोल ताशाचा गजरात मनसोक्त नाचले शेतकरी

नंदुरबार जिल्ह्यात महिनाभरानंतर पावसाची एन्ट्री झाली आहे. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी देवाकडे साकडं घालण्यात आलं होतं. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एका शेतकरी कुटुंब आनंद साजरा केला आहे. चक्क ढोल ताशांचा गजरात आपला आनंद व्यक्त केला आहे. या आनंद साजरा करण्याऱ्याचा व्हिडिओ जिल्हाभरात चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT