Sanjay Raut Claims PM Modi Is Tired And Unwell AI Image
महाराष्ट्र

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्ब्येत बिघडली, खासदार संजय राऊतांचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On Narendra Modi And Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी थकलेले आणि अस्वस्थ दिसत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. मोदी-शाह यांनी सत्तेपासून दूर व्हावे, असेही त्यांनी म्हटले.

Alisha Khedekar

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आजारी असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला

  • कुवत नसताना सत्तेच्या खुर्चीत राहणे राष्ट्रहिताचे नसल्याचे राऊतांनी म्हटले

  • मोदी आणि अमित शाह यांनी सत्तेपासून दूर होऊन मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी

  • राहुल गांधींच्या भूमिकेचे राऊतांनी कौतुक केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीवरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर दावे केले आहेत. मोदींची प्रकृती सध्या बिघडली असून ते अस्वस्थ आणि थकलेले दिसत आहेत. चालताना आणि बोलतानाही त्याचा परिणाम जाणवत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. देशहिताचा विचार करता थकलेल्या व्यक्तीने देशाचे नेतृत्व करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, मोदींना पाहिल्यानंतर ते अस्वस्थ असल्याचे जाणवते. त्यांना चालताना आणि बोलताना पाहिले असून ते थकलेले दिसतात. मोदी थकले आहेत, असे त्यांच्याच पक्षातील लोक सांगत असल्याचा दावाही त्यांनी केला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना करताना, नेहरू अखेरच्या काळात थकले होते, त्याचप्रमाणे मोदीही आता थकले असल्याचे राऊत म्हणाले. “कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीत बसणे हे राष्ट्रहिताचे नाही,” असे राऊत यांनी म्हटले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सत्तेपासून दूर होऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे. राष्ट्र प्रथम असेल तर त्यांनी हा निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोदींच्या झोपेबाबतही राऊत यांनी भाष्य केले. कमी झोप येणे किंवा झोप न येणे हे प्रकृती बिघडल्याचे अथवा मानसिक तणावाचे लक्षण असू शकते, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, राऊत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर दबाव निर्माण केला असून, सरकारच्या अपयशाचे मुद्दे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे मोदी सरकारला मंत्रिमंडळात मोठे बदल करावे लागू शकतात, असेही राऊत म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री अकार्यक्षम असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांसारखी काही मोजकीच नावे वगळता इतर नेत्यांच्या कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमित शाह यांच्यावरही राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. शाह यांची प्रतिमा खराब झाल्याचा दावा करत, त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केल्याशिवाय कोणत्याही बदलाला अर्थ नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधींचे नेतृत्व सत्तेवर अवलंबून नसून ते देशातील “अनडिस्प्युटेड नेते” असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमित शाह कधीही पंतप्रधान होणार नाही: Sanjay Raut यांचा मोठा दावा

Kitchen Cleaning : फक्त 7 सोप्या टिप्स फॉलो अकरा, 10 मिनिटांत किचन होईल चकाचक

Celebrity Beauty Secrets : चमकदार त्वचेचे देसी सिक्रेट! महागड्या क्रीम्सची गरज नाही, 'या' घरगुती उपायाने मिळवा सेलिब्रिटींसारखा नॅचरल ग्लो

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांचं टेन्शन वाढलं, सुप्रीम कोर्टानंतर लोकसभा अध्यक्षांकडून नोटीस

Cabinet Reshuffle : मोदी कॅबिनेटमध्ये २ नव्या मंत्र्यांची एंट्री निश्चित? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच 'या' नावांची चर्चा

SCROLL FOR NEXT