Bacchu Kadu News
Bacchu Kadu News  Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu : ...तर मुख्यमंत्री प्रहारचाच असता; बच्चू कडू काय म्हणाले? वाचा...

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टिव्ही

MLA Bacchu Kadu News : अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलंय. प्रहारजवळ जर १० आमदार असते, वेळ जर थोडी अधिक बदलली असती, तर येणारा मुख्यमंत्री (Chief Minister) सुद्धा प्रहारचाच राहिला असता, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे. अमरावतीत आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला संबोधित करताना आमदार बच्चू कडू बोलत होते. (Bacchu Kadu Todays News)

काय म्हणाले बच्चू कडू?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, आपल्यासाठी तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडे प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष दिलं पाहिजे. येणारी जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा नगरपरिषद निवडणूक प्रत्येकांनी प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी महत्वाचा आहे. उद्या जिल्हा परिषद प्रहारच्या ताब्यात आली. आपला एक कार्यकर्ता लाल दिव्याच्या गाडीत बसायला लागला तर ती प्रहार पक्षासाठी अभिमानाची गोष्ट असू शकते.

'मुख्यमंत्री प्रहारचाच राहिला असता'

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य असो किंवा नगरपरिषदेचा नगरसेवक प्रत्येकजण प्रहारसाठी महत्वाचा आहे. मी तुम्हांला सांगू इच्छितो प्रहारजवळ जर १० आमदार असते, वेळ जर थोडी अधिक बदलली असती, तर येणारा मुख्यमंत्री सुद्धा प्रहारचाच राहिला असता, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. (Bacchu Kadu Latest News)

'राजकारणात काहीही होऊ शकतं आज काय आणि उद्या काय कुणीच सांगू शकत नाही. म्हणून या सर्व गोष्टीवर बारीक नजर ठेवा, तुमची निष्ठा कायम ठेवा, सर्वसामांन्य माणसासोबतची नाळ तुटू देऊ नका आणि प्रहार पक्ष म्हणून तुम्ही मजबुतीने उभे राहा, येत्या विधानसभेत आम्ही १५ आमदार उभे करणार आहोत, त्यातील १० आमदार निवडून आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जिवाचं रान करू', असं देखील बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना संबोधिक करताना म्हटलं आहे.

बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार?

मविआ सरकारमध्ये बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं होतं. मात्र हे मंत्रिपद सोडून आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटाला आपला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर शिंदे गटाकडून मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा बच्चू कडूंना होती. मात्र, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात त्यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा आहे. अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर सुद्धा त्यांनी आपली नाराजी उघड केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal News: १०० चे १००० कोटी कसे झाले? अरविंद केजरीवाल यांच्या कारवाईवरुन सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल; सुनावणीत काय घडलं?

Live Breaking News : अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Rajendra Gavit News | शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश,फडणवीसांची उपस्थिती

Suryakumar Yadav Record: एकच वादा, सूर्या दादा..! शतकी खेळी करत मोडले हे मोठे रेकॉर्ड

Supriya Sule News : दत्ता भरणेंच्या अडचणीत भर; सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT