Independent MLA Bacchu Kadu reaction on Maharashtra cabinet expansion Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu on Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार नकोच, आहे तसंच राहू द्या; आमदार बच्चू कडूंचं विधान

Bacchu Kadu News: अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठं विधान केलं आहे.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही

Bacchu Kadu on Cabinet Expansion: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्णपणे पार पडलेला नाही. त्यामुळे काही आमदार अजूनही मंत्रिपदाच्या आशेवर आहे. दरम्यान, अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठं विधान केलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार झाला, तर मी इथं राहणार नाही. मी अमेरिकेत राहील, तर आता मंत्रिमंडळ विस्तार करू नका, जसं आहे तसंच राहू द्या, विनाकारण चार लोकांना दुःखी करायला घेतलं नाही, मंत्रीपद मिळालं नाही, आमदारांमध्ये नाराजी होईल, आता सरकारचा कारभार चांगल्या सुरू आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

आता जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आचारसंहिता लागू शकते. नंतर लोकसभा आणि मग विधानसभेची आचारसंहिता लागते. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा होणार नाही, असंही बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे मंत्रिपदाची आस धरून बसलेल्या आमदाराचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान, मध्यंतरी अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे युती सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

त्यातच अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांसाठी तत्कालीन मंत्र्यांच्या हातातील खाती काढून घेण्यात आली होती. त्यांना दुसरी खाती देण्यात आली होती. दरम्यान, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं. त्यामुळे महायुती सरकारने तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला. आता पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT