Solapur School Bus Accident News Saam TV
महाराष्ट्र

Bus Accident: सहलीला निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू, ५ ते ६ विद्यार्थी जखमी

Bus Accident News: शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या बसला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरात भीषण अपघात झाला.

Satish Daud

नितीन पाटणकर, साम टीव्ही

Solapur School Bus Accident News

शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या बसला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातात ५ ते ६ लहान विद्यार्थी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. ही दुर्देवी घटना माळशिरस तालुक्यातील (Solapur News) वटपळी परिसरात गुरुवारी (२१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस (Bus Accident) इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवारी (१९ डिसेंबर) कोकण दर्शनासाठी गेली होती.

या बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. गुरुवारी पहाटे बस गणपतीपुळे येथून इंदापूरकडे येत होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरज परिसरात बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

क्षणार्धात बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता, की बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एका शिक्षकासह ५ ते ६ विद्यार्थी देखील जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून एका शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT