कोरोनामुळे वाढले नैसर्गिक गर्भपात Saam Tv News
महाराष्ट्र

कोरोनामुळे वाढले नैसर्गिक गर्भपात

कोरोनामुळे नैसर्गिक गर्भपात आणि स्टील बर्थ म्हणजेच मृत बालकांच्या जन्माचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूरसह nagpur पूर्व विदर्भात east vidarb कोरोनाच्या पहिल्या first wave of corona आणि दुसऱ्या लाटेत second wave of corona भयावह स्थिती होती. याच काळात कोरोनामुळे नैसर्गिक गर्भपात natural abortion आणि स्टील बर्थ म्हणजेच मृत बालकांच्या still birth जन्माचं प्रमाणही वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या दीड वर्षात मेयो आणि मेडिकलमध्ये गर्भपाताच्या ५४५ प्रकरणांची नोंद झालीय. यातील सुमारे १५ टक्के प्रकरणे नैसर्गिक गर्भपाताची असून जवळपास १० टक्के प्रकरणांमध्ये कोरोना कारणीभूत असल्याचं दिसून आलंय. याशिवाय गेल्या दीड वर्षात एकट्या मेडीकलमध्ये ४५० च्यावर मृत बाळांचा जन्म झालाय. यातील काही प्रकरणात कोरोना कारणीभूत आहे. Increased natural abortion due to corona

हे देखील पहा -

नैसर्गिक गर्भपातासाठी प्रदूषण, तणाव, अयोग्य जीवनशैली, इन्फेक्शन आदी कारणे महत्त्वाची मानली जातात. मात्र, कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या गर्भवती महिलांमध्ये गर्भपाताच्या घटना वाढल्याचं दिसून येतंय. मागील दीड वर्षात मेयो आणि मेडिकलमध्ये गर्भपाताच्या ५४५ प्रकरणांची नोंद झाली. यापैकी काही गर्भपाताच्या प्रकरणावरून ही बाब लक्षात येतेय. कोरोनानं या जगात पाऊल ठेवणाऱ्या अनेक बालकांचा जगात येण्यापूर्वीच घात केला. एकट्या नागपूरात नाही तर राज्य आणि देशातही कोरोनामुळं नैसर्गिक गर्भपाताच्या घटना समोर आल्यात. त्यामुळं ही आकडेवारी आणखी मोठी असण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT