कालीचरण महाराजांच्या अडचणीमध्ये वाढ; अकोला काँग्रेसकडून तक्रार दाखल Saam TV
महाराष्ट्र

कालीचरण महाराजांच्या अडचणीमध्ये वाढ; अकोला काँग्रेसकडून तक्रार दाखल

कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग (Kalicharan Maharaj) याने महात्मा गांधींच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील (Akola) जुने शहर परिसरात राहणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग याच्या विरोधात उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने महात्मा गांधी विरोधात वादग्रस्त विधान केले होते. अकोल्यात काँग्रेसने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर भागात असलेल्या भावसार पंच बंगल्याजवळ रहिवासी अभिजित धनंजय सराग ऊर्फ कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी 26 डिसेंबर रोजी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्याने काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये (Kotwali Police Station) ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर कालिचरण महाराजाविरुद्ध प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांती कलम 294 व 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : घराच्या छपरावर चढला, आईवर बंदुकीने निशाणा धरला; पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची गोळी झाडून हत्या

Municipal Elections Voting Live updates : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Bank Jobs: खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Eggless Banana Cake : लहान मुलांनसाठी एग्लेस बनाना केक करायचा आहे? लगेच नोट करा रेसिपी

धक्कादायक! सरकारी हॉस्टेलमध्ये २ मुलींचा संशयास्पद मृत्यू, क्रीडा क्षेत्रात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT