लालपरी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ! Saam Tv
महाराष्ट्र

लालपरी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लालपरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लालपरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा लालपरी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली आहे. परिवहन मंत्री श्री. परब दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा लाभ लालपरी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी- अधिकाऱ्यांना होणार आहे.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीच्या अगोदर होणार आहे. लालपरीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ॲड.अनिल परब यांनी आभार मानले आहे. महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यामध्ये आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT