SHRAVAN : तुम्हाला माहित आहे का? श्रावणात नॉन - व्हेज का खात नाहीत?

Shruti Vilas Kadam

धार्मिक मान्यता

हिंदू धर्मात श्रावण महिना शंकराना समर्पित आहे. हा महिना देवपूजा, व्रत आणि तपश्चर्येचा काळ मानला जातो. श्रावणात शिवपूजा, रूद्राअभिषेक,जप, व्रत यांना विशेष महत्त्व दिले जाते.

SHRAVAN SPECIAL | PINTREST

सात्विक आहारावर भर

श्रावणात फळे , दूध, दही ,विविध प्रकारच्या भाज्या,कडधान्ये खाल्ले जातात. तसेच उपवासाच्या दिवशी राजगिरा, साबुदाणा,वरई इ.पदार्थ खाल्ले जातात.

SHRAVAN SPECIAL FOOD | PINTREST

तामसिक आहार

धार्मिक मान्यतेनुसार मासे, मटण, चिकन यांना तामसिक पदार्थ मानले जाते. यामुळे स्वभाव सुस्त, आळशी आणि रागीट होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे आपापल्या श्रद्धेनुसार श्रावणात नॉन-व्हेज खात नाही.

NON VEG IN SHARVAN | PINTREST

बॅक्टेरियाचा धोका

श्रावण महिना पावसाळ्यात येतो. या काळात हवेत ओलावा असल्याने बॅक्टेरिया वेगाने वाढतात . त्यामुळे आजार टाळण्यासाठी हलका आणि पोषक आहार केला जातो .

SHRAVAN SPECIAL | PINTREST

मंद पचनशक्ती

पावसाळ्यात दमट वातावरणात मानवी शरीराची पचनशक्ती मंदावते. म्हणून हलका सहज पचणारा आहार घ्यावा अशी प्रथा आहे .

SHRAVAN SPECIAL | PINTREST

उपवासााची परंपरा

श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाला शिवमूठ, बेलपत्र वाहण्याची परंपरा आहे . चांगला वर मिळावा म्हणून १६ सोमवार उपवास करण्याची परंपरा आहे. शिवाला प्रसन्न करण्यासाठी या काळात उपवास केले जातात.

SHRAVAN SPECIAL | PINTREST

प्राण्यांच्या प्रजननाचा काळ

श्रावण महिना हा अनेक जलचरांचा, प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो . निर्सगाची अन्न साखळी सुरक्षित राहावी आणि प्राण्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी या काळात नॉन व्हेज खाणे टाळले जाते.

SHRAVAN SPECIAL | PINTREST

मन:शांती आणि संयम

श्रावण हा भक्ती, ध्यान आणि संयमाचा काळ मानला जातो. त्यामुळे आहारातील काही पदार्थ टाळून साधेपणा आणि शिस्त पाळण्यावर भर दिला जातो.

SHRAVAN SPECIAL | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

SHRAVAN SPECIA | PINTREST

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

tags and warts | meta ai
येथे क्लिक करा