Nashik: आयकर विभागाचे छापे, 25 कोटींची रोकड जप्त; पाहा Video
Nashik: आयकर विभागाचे छापे, 25 कोटींची रोकड जप्त; पाहा Video अभिजीत सोनावने
महाराष्ट्र

Nashik: आयकर विभागाचे छापे, 25 कोटींची रोकड जप्त; पाहा Video

अभिजीत सोनावणे

नाशिक: नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. पिंपळगावमधील बड्या कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या छाप्यात कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं मोठं घबाड सापडलं आहे. कांदा व्यापाऱ्यांकडून तब्बल 25 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची कारवाई सुरु होती. 25 कोटींची रोकड मोजायला अनेक तास लागल्याची माहिती मिळत आहे. आणखीही कोट्यावधींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पिंपळगाव आणि नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय, निवासस्थानांवर छापे पडले होते. काही व्यापाऱ्यांच्या बँक खात्याचीही आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. कांदा व्यापाऱ्यांकडे इतकी रोकड आणि बेहिशेबी मालमत्ता आली कुठून? असा प्रश्न आयकर विभागाच्या अधीकाऱ्यांना आणि सर्वसामान्या जनतेला पडला आहे. आयकर विभागाच्या छाप्यानं कांदा व्यापाऱ्यांना धडकी भरली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to lose without exercise: डाएट आणि जीम न करता वजन कमी करायचंय? ६ टिप्स फॉलो करा

Maharashtra Politics 2024 : शरद पवार-ठाकरेंना पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी, इचलकरंजीतल्या सभेत अनेक जण धडपडले; VIDEO

Sudhir Mungantiwar News | '10 जून पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात येणार' मंत्री मुनंगंटीवार यांची माहिती

Today's Marathi News Live : ​महाविकास आघाडीच्या इचलकरंजीतल्या सभेत चेंगराचेंगरी

Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT