IT Raid In Nanded Saam Tv
महाराष्ट्र

IT Raid In Nanded: १४ कोटींची रोकड, १२ किलो सोनं; नांदेडमध्ये IT धाडीत १७० कोटींचं सापडलं

Rohini Gudaghe

नांदेडमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या मालमत्तेचे दस्तऐवज जप्त केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये १४ कोटींची रोकड आणि ८ कोटींचे दागिने असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये १२ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत सुमारे ८ कोटी रूपये आहे. विशेष म्हणजे या छाप्यातील रोकड मोजण्यासाठी सुमारे १४ तास लागल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेडमध्ये (Nanded) उद्योगपतींच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. यावेळी नांदेडमध्ये सात ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. नांदेडमध्ये आयकर विभागाने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. या छाप्यामध्ये सुमारे १७० कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. दोन दिवस नांदेडमध्ये ही छापेमारी (Income Tax Department Raid) सुरू असल्याची माहिती मिळतेय.

नांदेडमध्ये आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागल्याची माहिती मिळत आहे. जवळपास १४ कोटींची रोख रक्कम, १२ किलो सोने आणि कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे कागदपत्र या छाप्यामध्ये (IT Raid In Nanded) जप्त करण्यात आले आहेत. येवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोनं सापडल्यामुळे शहरात सर्वजण हादरूले आहेत. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आयकर विभागाने केल्याची माहिती एनडीटीव्हीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

नांदेडमध्ये अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडली आहे. त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. आता आयकर विभाग या मालमत्तेची चौकशी करत आहे. नांदेडमध्ये (Nanded News) एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कसा आणि कुठून आला? असा प्रश्न निर्माण होत आहे. आयकर विभाग याप्रकरणी अधिकचा तपास करत आहे. पोलिसांना छापेमारी जप्त केलेली रोकड मोजायला तब्बल चौदा तास लागले आहेत. नांदेडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पथकाच्या हाती १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT