रायगड जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बार राहणार खुले; मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण
रायगड जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बार राहणार खुले; मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण  SaamTv
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बार राहणार खुले; मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यातील मद्यापीसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील बार हे आजपासून सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यत 50 टक्के क्षमतेने कोरोनाच्या नियमाचे पालन करून सुरू करण्यात आले आहेत. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत निर्देश काढले आहेत. In Raigad district, bars will be open from 7 am to 4 pm; An atmosphere of joy among alcoholics

जिल्ह्यातील बार अँड रेस्टरट चार महिन्यानंतर सुरू झाले आहेत. बार सुरू झाल्याने व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता चार महिन्यानंतर बारमध्ये मद्यपी बसून भरलेल्या ग्लासाचे चिअर्स करणार आहेत.

हे देखील पहा -

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढला होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा जिल्हा लोकडाऊन झाला. जिल्हा लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांसह, बार व्यवसायिकांना देखील बसला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला असून जिल्हा तिसऱ्या स्तरात दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू झाले आहेत.

जिल्ह्यातील सर्व दुकाने हॉटेल, वाईन शॉप व्यवसायही सुरू झाला आहे. बार व्यबसायिकांना पार्सल सुविधा देण्यास परवानगी होती. मात्र वाइन शॉप सुरू असल्याने बारमध्ये अधिकचे पैसे देऊन मद्य खरेदी करणारे ग्राहक नगण्य असल्याने बार व्यवसायिकांना आर्थिक फटका बसला होता.

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 7 जुलै रोजी बार 50 टक्के क्षमतेने खुले करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ग्राहकांना बारमध्ये बसण्यास परवानगी आहे. वाइन शॉप व्यवसायिकांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सुविधा देण्यास परवानगी राहणार आहे. तर जिल्ह्यात शनिवार रविवार पूर्ण संचारबंदी असल्याने वाइन शॉप आणि बार हे बंद राहणार आहेत. बार सुरू झाल्याने मद्यापीही आनंदित झाले असून चार महिन्यानंतर बारमध्ये मैफिल रंगणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT