Amravati News
Amravati News Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीत किळसवाणा प्रकार, ४५ वर्षीय व्यक्तीला विष्ठा खाण्यास भाग पाडलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क ४५ वर्षीय शेतकऱ्याला मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. अमरावतीच्या (Amravati) बेनोडा पोलीस (Police) स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शेतस्त्यावरून नातेवाईकांचा वाद होता. या वादातून आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण करीत शेतकऱ्याला विष्ठा खाण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आहे. या घृणास्पद प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.

नेमकं काय घडलं ?

नांदगाव येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतस्त्यावरून नातेवाईकांचा वाद होता. २६ मे रोजी शेतकरी शेतातून घरी जात असताना रस्त्याचा वाद असलेला शेतकरी भेटला. यावेळी त्या आरोपींनी शेतकऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण तर एकाने त्या शेतकऱ्याला विष्ठा खाण्यास भाग पाडले. या प्रकरणी २ जूनला तक्रारदार शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध मारहाण करणे तसेच विष्ठा खाण्यास भाग पाडल्याची तक्रार शेतकऱ्याने बेनोडा पोलिसात दिली आहे.

यावरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. बबन बुरंगे, सुरेश बुरंगे, भूषण बुरंगे आणि श्रीराम ठाकरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

SCROLL FOR NEXT