Imtiyaz Jaleel
Imtiyaz Jaleel Saam Tv
महाराष्ट्र

MIM खासदार इम्तियाज जलील यांना धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबादचे(Aurangabad) खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये (Audio Clips) जलील यांना धमकवण्यात आलं आहे. यावर आज इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला अशा खूप धमक्या येतात, पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही, तसेच त्याला महत्वही देत नाही असं जलील यांनी म्हटलं आहे. या क्लिपमध्ये मला जी भाषा वापरण्यात आली आहे. त्यावर वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईल, असंही जलील यांनी ठणकावून सांगितलं आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) अगदी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एमआयएम कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. अकबरुद्दीन ओवेसी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी चादरही चढवली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

दरम्यान, औरंजेबाच्या कबरीवर चादर चढवल्यानंतर, त्यांच्यावर राजकीय स्तरातून मोठी टीका झाली. आपण औरंजेबाची औलाद असल्याचं ओवैसी यांनी दाखवून दिलं, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबला याच मातीत गाडलं आहे, आता त्याच्या भक्तांनाही कबरीत पाठवू असा इशारा दिला होता. मनसेकडून सुद्धा ओवैसींचा निषेध करण्यात आला होता. ओवैसींवर कारवाई करावी नाहीतर, जे होईल त्याला राज्यसरकार जबाबदार असा इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी दिला होता.

मी योग्यवेळी उत्तर देईल - जलील

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनाही फोनवरून धमक्या देण्यात आल्या. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपवर आता जलील यांनी प्रतिक्रिया दिली. "मला खूप धमक्या आल्यात, अजूनही येताहेत. मात्र मी जास्त महत्व देत नाही, जी भाषा वापरली आहे, त्या भाषेला वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईन. मी औरंगजेब कबरीवर गेलो त्यानंतर अनेकांनी मला शिव्या धमक्या दिल्यात, त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. या लोकांना इतिहास माहीत नाही. पक्षाच्या भाषेपेक्षा मी चांगल्या भाषेत उत्तर देईल" असं जलील यांनी ठणकावून सांगितलं आहे. शिवाय येणाऱ्या धमक्यांबाबत मी पोलिसात तक्रारही करणार नसल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT