आता क्रिकेटच्या मैदानातही 'मनसे' ची बॅटिंग; राज ठाकरे खेळाडूंना देणार खास गिफ्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मनसे जवळपास 500 बॅट्स खेळाडूंना वाटप करणार आहे.
MNS Cricket Bat
MNS Cricket BatSaam TV

मुंबई : मुंबईतील क्रिकेटची पंढरी म्हणून दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कची (Chhatrapati Shivaji Maharaj Park) ओळख आहे. याच पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांचे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. राज ठाकरे हे स्वतः क्रिकेटप्रेमी आहेत आणि हेच त्यांचे क्रिकेटप्रेम आता समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे खेळाडूंना खास भेट देणार आहेत. दरवर्षी मनसेकडून दादर इथल्या शिवाजी पार्कवर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी देखील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले, असता राज ठाकरे यांनी या क्रिकेटर्सना भेट देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राज ठाकरे ही भेट खेळाडूंना देणार आहेत.

MNS Cricket Bat
पुन्हा एकदा राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात घेणार जाहीर सभा

काय आहे भेट ?

क्रिकेट खेळायची म्हणजे बॅट हवीच आणि भेट द्यायची म्हणजे स्वतः ची जाहिरात हवीच. हीच गोष्ट लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मनसे जवळपास पाचशे खेळाडूंना बॅट्स वाटप करणार आहे. एक बॅट तब्बल दीड हजार रुपयांची असणार आहे. या बॅटवर आतील बाजूला मनसे नाव आणि शिवमुद्रा कोरलेली असेल, तर बॅटच्या बाहेरील बाजूस मनसे पक्षाचे चिन्ह इंजिन कोरलेले असेल. याशिवाय बॅटच्या दोन्ही बाजूला साईडलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे कोरलेले असेल.

मनसेची बॅटिंग किती चालणार ?

महानगरपालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे आणि अशा वेळी सारेच पक्ष तयारीला लागले आहेत. जमेल तिथे जाहिराती करून मतदारांपर्यंत पोहचण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. मनसेनेदेखील हिच युक्ती वापरत युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे  आता तरुणांच्या हातात काम नाही तर थेट बॅट देऊन मनसेने आपला हेतू सिद्ध करू पाहती. त्यामुळे मनसेची ही बॅटिंग किती चालणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com