पुन्हा एकदा राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात घेणार जाहीर सभा

औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार आहे
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विविध पक्षाचे नेते राज्यात जाहीरपणे सभा घेऊन एकमेकांवर टीकेचा भडिमार करताना दिसत आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या सभेनंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली आहे.

Raj Thackeray
फडणवीसांच्या वजनाची खिल्ली; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

पुणे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ संभाजी वावर यांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात यावी अशा स्वरुपाचं पत्र त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात ही सभा होणार असल्याचं या पत्रकात नमुद करण्यात आलं आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची सभा निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सूचनेनुसार आम्ही सभेसाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे मैदान निवडले असल्याचं या पत्रकाद्वारे मांडण्यात आलं आहे.

Raj Thackeray Pune Sabha
Raj Thackeray Pune SabhaSaam Tv

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध पक्षाचे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीकेचा भडिमार करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबाद येथील झालेल्या सभेत हिंदुत्वावरून सत्ताधारी पक्षावर टीका केली. तसेच मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात आंदोलनही पुकारलं. भोंगे उतरलेच पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेवरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकाही केली. एकीकडे राज ठाकरे यांची सभा होत असतानाच दुसरीकडे भाजपने देखील मुंबईत पोलखोल सभा घेतली होती.

दरम्यान, विरोधी पक्षाने हिंदुत्वावरून शिवसेनेला घेरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुंबईच्या बी.के.सी मैदानावर एक महाविराट सभा घेतली. या सभेतून त्यांनी विरोधकांवर टीकेचे बाण डागले. कॉंग्रेससोबत गेले असलो तरी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरेंनी विरोधकांना खडसावून सांगितलं. इतकंच नाही तर, काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं असा टोलाही त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्यासह मनसैनिकांचं लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com