Imtiaz Jalil/Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरे यांना MIMचे इम्तियाज जलील यांनी दिलं इफ्तारचं निमंत्रण

राज ठाकरे मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभेसाठी येणार आहेत, त्याआधी राज यांनी आमच्यासोबत इफ्तारसाठी यावं.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज राज ठाकरे (Imtiaz Jalil) यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना इफ्तारसाठी येण्याचे निमंत्रण दिलं.

यावेळी बोलताना जलील यांनी सांगितलं, राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभमीवर पोलिस कमिशनरांची भेट घेतली आहे. यावेळी आम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करु शकतो किंवा आमची मदत हवी आहे का अशी विचारणा केली. तसंच या सभे दरम्यान आम्ही औरंगाबादमध्ये कशी शांतता राखू शकतो यासाठीही चर्चा केली असल्याचं जलील म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी राज यांना इफ्तारसाठी निमंत्रण दिलं. ते म्हणाले, राज ठाकरे साहेब येणार आहेत मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर त्यांची सभा होणार आहे. त्याआधी राज यांनी आमच्यासोबत इफ्तारसाठी यावे असंही ते म्हणाले.

हे देखील पाहा -

तसंच या सभेनंतरही आपण सगळे हिंदू-मुस्लीम एकत्र राहू. जिल्ह्याला पुढे घेऊन जायच जर सगळ्यांनी ठरवलं तर कोणीही थांबवू शकत नाही. एक टक्केच लोक दंगा करत असतात, मात्र त्यासाठी पोलीस आहेत आपला पोलिसांवर विश्वास आहे. शिवाय पोलिसांनी लोकप्रतिनिधिंना हाताशी धरुन शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा असही ते म्हणाले. दरम्यान, भोंग्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, भोंग्यांच्या विषयाबाबत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने खुलासा केला आहे. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, कोर्टाच्या नियमांप्रमाणे कारवाई व्हावी मात्र जोरजबरदस्ती करु नये असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT