Nanded: काॅफी शाॅपमध्ये सुरु होते अश्लील चाळे; 9 मुली आणि 6 मुलं ताब्यात Saam TV
महाराष्ट्र

Nanded: काॅफी शाॅपमध्ये सुरु होते अश्लील चाळे; 9 मुली आणि 6 मुलं ताब्यात

संतोष जोशी

नांदेड : नांदेड शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल येथील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली आहे. यावेळी कॉफी शॉपमध्ये अश्लिल चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर परिसरात कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पाँईटच्या नावाने दुकाने उघडली गेली आहेत. यातील बहुतांश दुकानदारांनी आतील बाजूला अंधारमय खोली करून बसण्याची व्यवस्था देखील केली आहे.

बाहेरून जाणाऱ्यांना आतील काहीही दिसत नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी मुला-मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र कंम्पार्ट बनविले आहेत. या प्रकरणी राज मॉल येथील कॉपी शॉपच्या मालकासह दोघांवर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरात (Nanded) छेडछाडीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी दामिनी पथक स्थापन करून अवैध पद्धतीनं कॉफी शॉप चालवणाऱ्यांवर कारवाही केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT