राणेंच्या अटकेचा कार्यक्रम सरकार पुरस्कृत; दरेकरांची सरकारवर टीका

जिल्हा बँक राणेंच्या हातात जाईल म्हणून हा दबाव आणला जात असल्याचं दरेकर म्हणाले.
राणेंच्या अटकेचा कार्यक्रम सरकार पुरस्कृत; दरेकरांची सरकारवर टीका
राणेंच्या अटकेचा कार्यक्रम सरकार पुरस्कृत; दरेकरांची सरकारवर टीकाSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई : नितेश राणे यांच्यावर सुरु असलेली सुनावणी आणि नारायण राणे यांना आलेली नोटीस याबाबत बोलतना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले सरकार नारायण राणे, नितेश राणे यांना सूडबुद्धीने जेरीस आणत आहे. विधानभवनाच्या पायर्यांवर जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. पोलिसांवर दबाव आणला जातो, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते तेव्हाच नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक करायची असं ठरलं असावं. जिल्हा बँक राणेंच्या हातात जाईल म्हणून हा दबाव आणला जात असल्याचं दरेकर म्हणाले.

राणेंच्या अटकेचा कार्यक्रम सरकार पुरस्कृत; दरेकरांची सरकारवर टीका
कधी होणार महिला IPLचे आयोजन; BCCI सचिव जय शहांनी केला खुलासा

सरकार पुरस्कृत हा कार्यक्रम आहे. पोलीस हे कुणाचे खासगी नोकर नाहीत. केंद्रीय मंत्री म्हणून काही प्रक्रिया आहेत. आम्हाला राणेंवर कारवाई करायची आहे अशी भूमिका ठरलेली दिसते ज्यावेळी पोलीस प्रत्यक्षदर्शी जाब घेतील तेव्हा नारायण राणे (Narayan Rane) उत्तर देतील उद्या नितेश राणेंवर हल्ला झाला असता किंवा त्यांना जेरबंद केले असते तर त्याला कोण जबाबदार कायद्यानुसार योग्य ती प्रक्रिया राणे करतील अस वाटतं अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

देशाच्या कॅबिनेट मंत्र्याना असे अपमानित करणे चुकीचे आहे ही कारवाई सुडाने होत आहे. अनेक संकटं आली तरी नारायण राणे यांनी फिनिक्स पक्षाप्रामाणे भरारी घेतली आहे. यावेळी मुंबईची निवडणूक भावनिक केली जाणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल. राणेंना भाजपपासून वेगळे करता येणार नाही. अमित शहा, मोदींनी त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. भाजप राणेंच्या सोबत काल होती आजही आहे असे वक्तव्य दरेकरांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com