कधी होणार महिला IPLचे आयोजन; BCCI सचिव जय शहांनी केला खुलासा

शाह यांनी परदेशी टी-२० लीगमध्ये भारताच्या उर्वरित खेळाडूंचे कौतुक केले आहे.
कधी होणार महिला IPLचे आयोजन; BCCI सचिव जय शहांनी केला खुलासा
कधी होणार महिला IPLचे आयोजन; BCCI सचिव जय शहांनी केला खुलासाTwitter
Published On

भारतातील महिला क्रिकेट (Women Cricket Team) दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. भारतीय महिला खेळाडूंनी विदेशी लीगमध्येही आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. भारतीय खेळाडूंनी बिग बॅश लीग, द हंड्रेडला मध्ये आपल्या खेळाची धाप सोडली आहे. भारतातही महिला आयपीएल (IPL) व्हावी याबाबात सतत चर्चा होत असते. पुरुषांच्या आयपीएलसोबतच बीसीसीआय महिला चॅलेंजर नावाची स्पर्धा आयोजित करत असले तरी ती फक्त चार संघांची असते. देशातील महिला आयपीएलबाबत भारतीय खेळाडूंनीही सातत्याने आवाज उठवला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सांगितले की, बोर्ड महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्टाईल लीग आणण्यावर काम करत आहे.

हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जय शाह यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “महिला टी-२० चॅलेंजमध्ये चाहत्यांमध्ये खूप उत्साह होता आणि ही एक रोमांचक गोष्ट आहे. महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग आपल्या सर्वांना हवी आहे. पण तीन-चार संघ एकत्र करून महिलांची आयपीएल सुरू करावी, असे नाही.

कधी होणार महिला IPLचे आयोजन; BCCI सचिव जय शहांनी केला खुलासा
IPL 2022: नव्या हंगामात 5 गोलंदाज होणार मालामाल? 'या' भारतीय बॉलरवर नजरा

अनेक गोष्टी महत्त्वाच्या

यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे शाह म्हणाले. ते म्हणाले, “ते म्हणाले की अशी स्पर्धा आयोजीत करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात जसे की एकच विंडो असणे, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना उपलब्धता, दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डची मान्यता. आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहोत आणि भविष्यात आमच्या महिला खेळाडूंसाठी अशाच प्रकारच्या लीग आयोजित करण्यावर काम करत आहोत. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर सारख्या खेळाडूंनी भारताची स्वतःची महिला लीग असावी आणि त्याचा देशाच्या क्रिकेटला कसा फायदा होईल याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे.

या खेळाडूंचे कौतुक करा

शाह यांनी परदेशी टी-२० लीगमध्ये भारताच्या उर्वरित खेळाडूंचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “आयपीएलसारख्या लीगमुळे आमच्या खेळाडूंना निश्चितच मदत होईल कारण त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्टार्ससोबत खेळण्याची संधी मिळेल. स्मृती आणि हरमनप्रीत व्यतिरिक्त भारताच्या उर्वरित खेळाडूंनीही परदेशी टी-20 लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. द हंड्रेड आणि WBBL मध्ये, दीप्ती शर्मा, जेमिहा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा आणि पूनम यादव यांनी परदेशी लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे आणि भारतातील रोल मॉडेल आहेत. तिथे खेळल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.”

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com